
दोडामार्ग : कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेरवण ( ता. दोडामार्ग ) येथील मुख्य रस्त्यावरील मोरी वाहतुकीच्या दृष्टीने नादुरुस्त झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी तेरवण मधील ग्रामस्थांनी केली आहे.
तेरवण मध्ये केगदवाडी येथे तिथीच्या तिथे दोन मोऱ्या असून त्या वाहतुकीसाठी धोकादायक बनल्या आहेत. या मार्गावरून कर्नाटक, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांची ये जा सुरू असते. तेरवण गावात जवळजवळ ७५ वर्षानंतर म्हणजे गाव निर्मितीनंतर अलीकडेच एसटी बससेवा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मार्ग निर्धोक होण्यासाठी या मोऱ्यांची दुरुस्ती – डागडुजी होणे आवश्यक असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी विजय गवस, ब्रम्हा गावडे, तुकाराम गवस, विश्वनाथ गवस, सदाशिव गवस, अजय नाईक, रोहन सावंत, रमेश सावंत, ऋतुजा सावंत, मंगल गवस, उमेश गवस, विजय गवस, सचीन गवस, सुहास गवस, संतोष गवस, पांडुरंग गवस, व इतर ग्रामस्थांनी केली आहे.