
सावंतवाडी : बांदा देऊळवाडी येथील जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (वय ७८) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. पत्रकार निलेश मोरजकर यांचे ते वडील होत.
आज सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार निलेश मोरजकर यांचे वडील तसेच शिक्षिका रिन मोरजकर यांचे ते सासरे होत.