
मंडणगड : लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव मध्ये ' मराठी भाषा गौरव दिन ' उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक विजय खाडे यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन केले प्रशालेतील शिक्षिका श्रीम.अनिता बिरादार, ग्रंथपाल श्रीम.वैशाली पुदाले यांनीही प्रतिमा पूजन केले.यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनींनी मराठी भाषा गौरव गीत सादर केले.
यानंतर प्रशालेतील शिक्षक किशोर कासारे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व तसेच वि .वा. शिरवाडकर यांच्या जीवन चरित्रा विषयी माहिती दिली. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक विजय खाडे यांनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे व आपले जीवन आणि व्यक्तिमत्व घडवावे .असे आवाहन केले.
यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला भाई गुडेकर व श्रीकृष्ण दळवी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.