
मालवण : नगरपालिका हद्दीतील सातेरिमांड येथे परप्रांतीय गेली दोन वर्षे राहत आहेत. दारूच्या नशेत असलेले हे परप्रांतीय रस्त्यावरून नकोते कृत्य करत जात असतात. स्त्रियांसह आम्हा पुरुषांनाही या परिसरात एकटे फिरणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी तेथील रहिवासी राजन भोजणे यांनी तहसीलदार तसेच मालवण पोलिसांकडे केली आहे.
राजन भोजणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नगरपालिका हद्दीतील सागरीमहामार्ग या ठिकाणाहून निघालेला बायपास आंगणेवाडीरोड येथे मा. म्यु.घर नं. २८२५ड या घरामध्ये माझे कुटुंबियांसह राहतो. तसेच त्याच ठिकाणी माझा हॉटेलचा व्यवसाय आहे. सदरहू व्यवसाय करुन मी माझा व माझे कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवितो. गेली २ ते ३ वर्षापासून आमचे राहते घरापासून पुढे सुमारे ५० ते ६० मीटरवर परप्रांतिय परप्रांतीय लोक भाडेतत्वावर राहतात. तसेच ते रात्री अपरात्री लगत असलेल्या नदीमध्ये जावून मच्छिमारी करतात. रस्त्यावर आरडाओरड व संपूर्ण परिसरामध्ये कचरा, घाण टाकतात. इतकेच नव्हे तर आम्ही आमचा हॉटेल व्यवसाय बंद करुन रात्रीच्या वेळी झोपी जाण्याचे दरम्याने हे लोक दारुच्या नशेमध्ये या परिसरामध्ये विनाकरण आराडाओरड करणे, कुत्र्यांना भडकवणे अशी कृत्ये करुन आमची निदानाश करतात. तसेच सदर लोक हे आडदांड व अविचारी असल्यामूळे त्यांचे पासून आमचे स्त्रियांना व आम्हांस सदर परिसरामध्ये एकटे फिरणे देखील कठीण झालेले आहे. या इसमांपासून होत असलेला त्रास हा आम्हाला मानसिक दृष्टया फार मोठा धक्का आहे. त्यामुळे या परप्रांतिय लोकांविरुध्द तात्काळ व तातडीने चौकशी करून कारवाई कारवाई आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी भोजणे यांनी केली आहे.