वेंगुर्ला खर्डेकर महाविद्यालयाचे माजी अधीक्षक प्रदीप परब यांचे निधन

Edited by: दिपेश परब
Published on: February 27, 2025 16:18 PM
views 146  views

वेंगुर्ला : वेंगुर्ले शहरातील देऊळवाडा येथील रहिवासी व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे माजी अधीक्षक प्रदीप मेघश्याम परब (६८ ) यांचे आज गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, भाऊ, बहिणी, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे.

     महिला काथ्या औद्योगिक कामगार संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब यांचे ते पती, प्रसिद्ध वकील अँड. संदीप परब व डॉ. वैभव परब यांचे ते वडील तर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे खात्यातील कर्मचारी  समृद्धी साळगांवकर-परब व डॉन बास्को इंग्लिश स्कुल, ओरोस मधील शिक्षीका स्नेहल परब यांचे ते सासरे होत. तर सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक प्रकाश परब यांचे ते बंधू होत.