
वेंगुर्ले : सामाजिक कार्यकर्ते पंकज शिरसाट, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, जिल्हा रुग्णालय ओरोस, व गर्दै नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा ८२ जणांनी लाभ घेतला. पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या शिबिरात कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य रक्त, दंत व नेत्र तपासणी तसेच मोफत उपचार करण्यात आले.
रोटरी क्लबचे पदधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते पंकज शिरसाट यांनी आपला सुपुत्र कु. ध्रुव शिरसाटच्या दुसऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबीराचे आयोजन केले होते. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष योगेश नाईक, माझा वेंगुर्ला संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, नागेश उर्फ पिंटू गावडे, सामाजिक कार्यकर्ते अजित राऊळ, उबाठा तालुकाप्रमुख बाळू परब, बॅ खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. भेंडवडे, माजी नगरसेवक उमेश येरम, नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, नीशा आळवे, बापू वेंगुर्लेकर, जिल्हा रुग्णालयाच्या स्त्री रोग तज्ज्ञ करंबळेकर, दंत चिकित्सक डॉ घाकोरकर, आयुष विभागाचे डॉ. गोडकर, स्टाफ नर्स तृप्ती जाधव, सावली वेंगुर्लेकर, अनिता बिबवणेकर, समुपदेशक हर्षदा मुणनकर, डॉ गद्रे नेत्र रुग्णालयाचे उदय दाभोलकर, वैष्णवी दाभोलकर, रमिता गावडे, एश्वर्या जाधव, तेजस वेंगुर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते.
वेंगुर्ले नगर पालिकेच्या आजवरच्या स्वच्छता अभियानातील यशात पालिकेचे कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. हे लोक सतत कार्यरत असतात. त्यामुळे वेंगुर्ले शहर स्वच्छ व सुंदर पहायला मिळते. ते सतत कामात मग्न राहिल्याने अनेकदा त्यांचा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतो. नेमकी हीच बाजू लक्षात घेऊन पंकज शिरसाठ यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले ही बाब खुप आश्वासक आहे, असे मत यावेळी बोलताना माझा वेंगुर्लाचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी व्यक्त केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश नाईक, नगर पालिकेच्या प्रशासकीय अधीक्षक संगीत कुबल यांनी मनोगत व्यक्त करताना पंकज शिरसाट यांचे नगरपरिषदेच्या वतीने आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले