सावंतवाडी ओरोस वर्दे ते गावठणवाडीपर्यंत बस पूर्ववत करण्याची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2025 17:34 PM
views 150  views

सावंतवाडी : सावंतवाडी ओरोस वर्दे ते गावठणवाडी पर्यंत बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी केली आहे. सद्यस्थितीमध्ये ही बस फेरी ही रमाईनगर येथून मागे फिरवली जाते. त्यामुळे कोकेमळवाडी व गावठाणवाडी येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही बस फेरी गावठणवाडी पर्यंत पूर्ववत केल्यास येथील प्रवाशांची होणारी पायपीट व आर्थिक भुर्दंड थांबणार आहे.

तसेच गावठणवाडी मठ येथे गाडी वळवण्यासाठी जागा उपलब्ध आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी एस.टी आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव उपस्थित होते.