
देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील आर्या दयानंद कदम हिने गणित प्राविण्य परीक्षेत यश संपादन केले आहे.
तिची प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनीला गणित शिक्षक विनायक न. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. अजितराव गोगटे व कार्यवाह प्रवीण जोग, शाला समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर व मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.