
देवगड : पंचायत समिती देवगड येथे शिवजयंती मोठया उत्साहात संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक कुणाल मांजरेकर, पशुधन अधिकारी डॉ . घोगरे, कृषी विस्तार अधिकारी मदने, सचिन जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुरवातीला शेठ म. ग. हायस्कुलच्या विद्यार्थांनी पोवाडा सादर केला. त्यानंतर आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु यांनी शिवगीत, कुळकर्णी हिने बासरी वादन , हेमांश चव्हाण व मेध चव्हाण यांनी शिवगीत, पुजा तावडे हिने डान्स, तर बालक अरविंद कुंभार याने नामघोष व पर्यवेक्षिका पुजा सावंत हिने आरती सादर केली. तसेच गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव, सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, सचिन जाधव, पशुधन अधिकारी डॉ . घोगरे यांनी विचार मांडले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने संपूर्ण परीसर चैतन्यमय झाला होता.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक धुरी तर आभार कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी मानले.