
दोडामार्ग : शारदा संगीत विद्यालय साटेली (जळकटवाडी) या संगीत विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच खोक्रल गावात मंदिर सभामंडपात विद्यार्थी, ग्रामस्थ व संगीत प्रेमिंच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी व्यापीठावर धर्णे प्रतिष्ठान साटेलीचे अध्यक्ष संदीप धर्णे, पांडुरंग गवस, घोटगेवाडी हाय. मुख्या. कांबळे सर , हास्य कलाकार अरुण गौडळकर , सोमा गवस ,सामाजिक कार्यकर्ते संतोष मौर्य,अरुण नाईक, विद्यालयाचे अध्यक्ष महादेव सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संदीप धर्णे यांनी 'आमच्या साटेली गावात' शारदा संगीत विद्यालयाच्या माध्यमातून महादेव सुतार हे तरुणांना संगीताचे धडे देत आहेत.हे काम पुंण्याचे आहे. कारण आजच्या तरुण पिढीला विरंगुळ्यासाठी चुकीची माध्यम विळखा घालत असताना या तरुणांना संगीताच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याला स्थैर्य देण्याचे काम श्री.सुतार हे करत आहे असे उदगार काढले. यावेळी श्री. मौर्य, श्री. नाईक यांनीही विद्यालाच्या यशाचा आलेख सर्वांसमोर मांडला. यावेळी अध्यक्ष महादेव सुतार यांनी साटेली गावचे रहिवासी शिक्षक सतीश धर्णे हे विद्यालयाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करतात तसेच संदीप धर्णे हे ही आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देतात असे मत मांडले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोतीराम गवस, पांडुरंग गवस,कृष्णा गवस, दत्ताराम गवस, फटी गवस, सुरेश गवस, प्रकाश वर्णेकर, पत्रकार रत्नदीप गवस यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच दशावतार या लोककलेच्या माध्यमातून नावारूपाला आलेले सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळेचे मालक फटी रत्नु गवस (पिकुळे) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात यशदिप अरुण नाईक ( साटेली) , श्रेयस भाऊसाहेब देसाई ( हेवाळे) , तनिष निलेश भणगे ( भेडशी) या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ साळोस्कर यांनी तर आभार महादेव तुकाराम सुतार यांनी मानले.