घरेलू महिला कामगार स्मार्ट कार्डचे वाटप

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 15, 2025 18:21 PM
views 283  views

मालवण : वायरी भूतनाथ उपसरपंच प्राची मांणगावकर यांनी महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा कामगार मंडळ यांच्याकडे वायरी भुथनाथ गावातील घरेलू महिला कामगार यांची कामगार मंडळ सिंधुदुर्ग यांच्याकडे नोंदणी करत त्यांना स्मार्ट कार्डचे वाटप केले. यावेळी देवानंद लुडबे, पराग मांणगावकर, ममता तळगावकर उपस्थित होते. 

या योजनेतून घरेलू कामगार लाभार्थी संचिता सदानंद धुरी, दीपाली दिगंबर धुरी, अक्षता अशोक धुरी, नम्रता परमानंद धुरत, पूर्वा प्रकाश धुरी, शिल्पा काशिनाथ मांजरेकर, रोहिणी रुपेश तळवडेकर, विश्रांती देवदत्त धुरी, स्वाती दत्तात्रय कुंभार, आरती आत्माराम मांजरेकर, रश्मी रामचंद्र गोलतकर, रतिका राजेंद्र करंगुटकर, विणा विठ्ठल पाटकर, रसिका रवींद्र केळूसकर, ज्योती उदय तळवडेकर, प्रणाली हर्षद हळदणकर, अर्चना हरिश्चंद्र तळवडेकर यासह अन्य लाभार्थी महिला उपस्थित होते.