
बांदा : श्री देव पिंपळेश्वर गणपती मंडळ बांदा माघी गणेश जयंती निमित्त शनिवारी 01 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी होणार आहे.
यानिमित्त सकाळी 05 वाजता काकड आरती अभिषेक व पूजा, सकाळी 08. 00 वाजता गणेश पूजा, 09.00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होणार आहे. तसेच दुपारी 1.00 महा आरती व महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी 4.30 वाजता सुस्राव्य भजनाचा कार्यक्रम तसेच 6.30 ला आरती होणार आहे. तसेच रात्रौ 8.00 वाजता बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ कोळंब भडवाडी मालवण यांचा सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा महान नाट्यप्रयोग होणार आहे.
तसेच रविवारी दुसऱ्या दिवशी पारंपारिक डबलबारी चा जंगी सामना दत्त प्रासादिक भजन मंडळ मुंबई( भांडुप ) बुवा भगवान लोकरे व लिंग माऊली प्रसादिक भजन मंडळ सांताक्रुज मुंबई बुवा श्रीधर मुणगेकर यांचा डबल बारिचा जंगी सामना होणार आहे. तरी सर्व भक्त गण तसेच रसिक प्रेक्षकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पिंपळेश्वर गणपती मंडळ बांदा यांनी केले आहे.