सावंतवाडी नं. 6 चे स्नेहसंमेलन उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: January 29, 2025 15:02 PM
views 278  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.  प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा सावंतवाडी नं 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाल. 

 या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भालेकर भोजनालयाचे मालक राजू भालेकर हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, डॉ.सुमेधा नाईक-धुरी, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर,  पवार, श्रीम.मुननकर, ॲड.संजू शिरोडकर, श्रीम. खोचरे, श्रीम तुयेकर आदी उपस्थित होते. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू भालेकर यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून  कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इनरव्हील क्लब तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यां विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झालीत.अध्यक्षस्थानावरून बोलताना राजू भालेकर यांनी सर्वांना शुभेच्छा देताना शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी भरीव प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. शाळेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर दिलीप भालेकर यांनी सुधीर आडिवरेकर यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. शाळेच्या शिक्षिका श्रीम. सायली लांबर  आणि मेघा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विविध कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

संध्याकाळी रघुकुल स्वरविहार सावंतवाडी प्रस्तुत सुमधुर भावगीतांवर आधारित स्वरसांज हा कार्यक्रम  ईश्वरी तेजम आणि सहकाऱ्यांनी सादर केला.

सकाळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तर सांजवेळी दीपोत्सव हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पालकवर्गासह  शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा खोचरे, उपाध्यक्षा तुयेकर, दिलीप भालेकर ,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा श्रीम. शेख ,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. तेजम,श्रीम.तेजम,पालक वर्ग, शिक्षक वर्ग यांनी प्रयत्न केले.