अति गती होईल जीवाची माती

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांचं मार्गदर्शन
Edited by: लवू परब
Published on: January 23, 2025 16:21 PM
views 177  views

दोडामार्ग : रस्त्यावरील रक्तपात आपल्याला कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक नियम पाळले पाहिजे.  अति गती होईल जीवाची माती अस म्हटलं जात. ते कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्या गतीला ब्रेक दिला पाहिजे तरच आपला जीव रस्त्यावर सहिसलामात राहील अस मोलाच मार्गदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी विद्यार्थ्यांना केल. 

लक्ष्मीबाई सीताराम हळबे कॉलेज येथे आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियाना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत मोटर वाहन निरीक्षक रत्नाकांत ढोबळे, शाय्यक मोटर वाहन निरीक्षक अनिल पाटील, मोटर ड्राइव्हिंग स्कुल चे अनिल पावसकर, प्राध्यापक सुभाष सावंत, लक्ष्मण खडपकर आदी उपस्थित होते.

यावेळी विजय काळे बोलताना म्हणाले की, आपण जन्मताच चाललायला शिकतो त्यावेळी आपण रस्त्यावर चालतो सायकल, दुचाकी, चारचाकी, किंवा पायी चालत असतो. त्यावेळी आपण रस्त्यावरचे जे नियम आहेत ते पाळूनच आपण रस्त्यावर चालावे. सायकल चालवत असताना फ्लॅश लावणे, किंवा चमकणारे जॅकेट घालणे, चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूनेच चालावे दुचाकी चालवताना हॅलमेंट वापरावे, चारचाकी चालविताना नेहमी सिटबेल्ट चा वापर करावा, गाडी चालविताना फोनचा वापर करू नये. महत्वाचा फोन असेल तर गाडी बाजूला उभी करून फोन घेणे यासारखे सर्व नियम तुम्ही पाळलात तरच रस्ते अपघाताची संख्या कमी होऊन प्रत्येकाचा जीव वाचेल. त्यामुळे या सेव नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपला व दुसऱ्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करा असे आवाहनही विजय काळे यांनी मुलांना केले  आहे. 


स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानत रस्ते अपघात व नियम याबद्दल मार्गदर्शन करताना विजय काळे यांनी आजच्या स्पर्धा परीक्षा कशा असतात आणि कुठली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यावर कोणते अधिकारी होतात. या बद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक लक्ष्मण खडपकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेपाली गवस हिने मानले.