
सावंतवाडी : कला संचालनालय मुंबई मार्फत ६४ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन यंदा नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर शिल्पकला विभागातून विद्यार्थी विभागात मूलभूत अभ्यासक्रमात सावंतवाडी तालुक्यातील मळगाव कुंभारवाडीतील गौरांग बाबुराव खडपकर याला राज्यात ६ नंबरचे पारितोषिक मिळाले.
त्याच्या ह्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीतील त्याच्या मूळ गावी मळगाव कुंभारवाडी येथील कुंभार समाज बांधवांच्या उपस्थितीत कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, कलाशिक्षक विष्णु माणगावकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मळगाव कुंभारवाडीतील समाजबांधव तसेच गौरांग खडपकर, वडील बाबुराव खडपकर, प्रा. गणपत शिरोडकर , नाना शिरोडकर, काशीनाथ तेंडूलकर, सिद्धेश तेंडुलकर, महेश खडपकर, संजय शिरोडकर, किशोर खडपकर एकनाथ खडपकर, अविनाश तळवडेकर, सुंदर तेंडुलकर व इतर समाज बांधव उपस्थित होते.