
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन पंधरवडा सांगता समारंभात चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतना शिरगाव हायस्कूल माजी मुख्याध्यापक व शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम यांनी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला ते म्हणाले, वैयक्तिक व सामाजिक विकासासाठी आणि वाचन संस्कृती संवर्धनासाठी युवा पिढीने वाचनाची सवय महाविद्यालयीन काळातच लावून घ्यावी आणि आपला व्यक्तिमत्व विकास साधावा, वाचनाने आमची पिढी घडली तशीच नवी पिढी घडावी यासाठी वाचनाचा संकल्प करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिरगाव हायस्कूल माजी मुख्याध्यापक व शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय व राज्यतंत्र शिक्षण मंडळ परिपत्रकानुसार शिरगाव पंचक्रोशी तालुका देवगड शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन पंधरवडा सांगता समारंभात विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला.
यावेळी संस्था महाविद्यालयीन समिती चेअरमन संभाजी साटम, मानदअधीक्षक सुधीर साटम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन वाचन संकल्प समिती द्वारे सदर वाचन पंधरवड्याच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन, ग्रंथदिंडी, ग्रंथालय भेट व परिचयांतर्गत शिरगाव हायस्कूल व शिरगाव पावणाई वाचनालय यांना विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या गेल्या तसेच या उपक्रमांतर्गत शिरगाव संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार दिनेश साटम यांनी आपल्या व्याख्यानातून 'वृत्तपत्रीय वाचनाचे महत्व व वृत्तपत्रीय सदरांविषयी उपयुक्त माहिती दिली कनिष्ठ महाविद्यालय मराठी शिक्षक संघाचे जिल्हा सचिव व शिरगाव ज्यु. कॉलेजचे मराठीचे प्रा. सागर करडे यांनी 'संवाद कौशल्यात वाचनाचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पुस्तक परीक्षण, मालवणी बोली, मराठी साहित्य सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धाचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करून सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांनी या उपक्रमाच्या समारोप मनोदयात अकादमीक शिक्षण घेत असताना अशा निरनिराळ्या महाविद्यालयीन उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच प्रयत्न असल्याचे नमूद केले. प्रा. सिद्धी कदम यांनी 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या शासनाच्या उपक्रमाची भूमिका व वाचन पंधरवड्यात महाविद्यालयाने घेतलेले उपक्रम विषद करून प्रस्ताविक केले.
या वाचन संकल्प महाराष्ट्राच्या सांगता समारंभास विशेष उपस्थिती विजयकुमार कदम यांनी दर्शविली होती महाविद्यालयाचे प्राचार्य मा. समीर तारी, प्रा. कोमल पाटील, प्रा. सोनाली ताम्हणकर व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात आभार प्रदर्शन प्रा. सुगंधा पवार यांनी केले. तर प्रा. मयुरी कुंभार यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.