सिंधुदुर्गनगरी : अनेक नामांकित व्यक्ती तळगाव प्राथमिक शाळा नंबर एक येथेशिक्षण घेऊन गेले ते आज खासदार आमदार वेदकशास्त्र यासह विविध क्षेत्रात नावावर उपास आले आहेत. शाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमातूनशाळेच्या पुढील शैक्षणिक विकासासाठी आणि नवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठीआपण सर्वांनीप्रयत्नशील राहूया असे विचार तळगाव सरपंच लता खोत यांनी व्यक्त केले.
मालवण तालुक्यातील तळगाव या गावातील प्राथमिक शाळा क्रमांक एक जीवन शिक्षण शाळा शतक महोत्सवी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावचे सरपंच लता खोत, बॅ नाथ पै चे प्राचार्यअशोक वेदरे, तळगाव हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष उत्तम दळवी, राजा दळवी, ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रसाद दळवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन दळवी, सचिव नीलम बोर्डवेकर, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्तविकात तळगाव येथील ग्रामस्थांनी शाळेचा शतक महोत्सवी कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतलात्यानुसार दोन दिवस हा शतक महोत्सव साजरा होत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात विविध शालेय स्पर्धा माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे गुणदर्शन कार्यक्रम या शाळेमध्ये आतापर्यंत आलेले सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार माजी सैनिकांचा सत्कार, तसेच विविध बक्षीस वितरण लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोखरण व विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ पुरळ यांचा डबलबारी सामना, सत्यनारायण महापूजाकलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक कामदेव गर्वहरण नाट्यप्रयोग आदींसह विविध कार्यक्रमांचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते.