मंडणगड : मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून हाती घेतलेले गावाच्या नळपाणी योजनेचे काम तातडीने सुरु न केल्यास स्वातंत्र्य दिनी मंडणगड पंचायत समितीचे कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
10 जानेवारी 2025 रोजी वाल्मिकीनगर येथील ग्रामस्थ नयना तबीब, दीपक तबीब, विश्वजीत पाटील अशोक चोगले, आत्माराम कारभारी साक्षी किंकले, भारत तबीब, उमेश तबीब, सुनील खाडे यांनी गटविकास अधिकारी विशाल जाधव यांची भेट घेऊन अभियंता जिल्हा परिषध ग्रामिण पाणी पुरवठा पंचायत समिती मंडणगड यांच्याकडे सादर केलेल्या लेखी निवेदनातील माहीतीनुसार वाल्मिकीनगर या गावासाठी जलजीवन मिशनचे माध्यमातून नळपाणी योजना मंजुर झाली आहे. मागील वर्षी 24 फेब्रुवारी 2023 रोजी योजनेचे कामकाज सुरु करण्याचा आदेश झाला असून, त्यानंतर 18 महिन्यात काम पुर्ण करावयाचे होते. यास 2 वर्ष पुर्ण होत आहेत. योजनेतील पाण्याचे टाकीचे कॉलम उभे करण्यात आले असून अर्धवट पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 2023 ला नमुद वेळेत श्री. आदीशक्ती कन्स्ट्रक्शन यांनी सब कॉन्ट्रेक्टर लालसिंग राठोड यांच्या माध्यमातून योजनेचे काम सुरु केले पावसाळ्याचे कालवधीत काम बंद करण्यात आले. 10 ऑक्टोंबर 2024 रोजी ग्रामस्थांचे शिष्टमंडळाचे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन काम सुरु पुन्हा सुरु कऱण्याची विनंती केल्याने ठेकदारास काम पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले पंरतू ठेकेदाराने आजतागायत काम सुरु केलेले नाही. या संदर्भात ग्रामस्थांनी 6 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी ठेकेदारास दुसऱ्या वेळेसही काम सुरु करण्याच्या सुचना दिल्या 26 डिसेंबर 2024 रोजी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ गटविकास अधिकारी मंडणगड यांच्या दालनात सब कॉन्ट्रेक्टर लालसिंग राठोड यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरात लवकर काम सुरु करण्याचे आश्वासन दिले. पण त्यानंतर अजूनही योजनेचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे वाल्मिकीनगर या गावात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. गावातील तीव्र पाणी टंचाईस प्रशासनास पुर्ण जाण असल्याने लवकरात लवकर काम सुरु करावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
काम सुरु न झाल्यास 26 जानेवारी 2025 रोजी सर्व ग्रामस्थ पंचायत समिती मंडणगड यांच्या कार्यालयसमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर विश्वजीत पाटील अशोक चोगले, लिलाधर कारभारी यांच्या सह्या असून निवेदनाची प्रत खासदार सुनील तटकरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, तहलिदार मंडणगड पोलीस ठाणे मंडणगड व बाणकोट यांना पोहच करण्यात आली आहे.