न्हावेली उपसरपंचांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा

Edited by: विनायक गांवस
Published on: January 09, 2025 16:33 PM
views 108  views

सावंतवाडी : न्हावेली पंचक्रोशीत गव्याकडून शेतकऱ्याच्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अलिकडेच पावसाळ्यात भात शेतीमध्ये गव्यानी मोठ्या प्रमाणात हैदोस घालून नुकसानीची भरपाई न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक रक्कमेची नुकसान भरपाई पार्सेकर यांनी तेथील शेतकर्‍यांना मिळवून दिली आहे.

न्हावेली गावात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना त्रास सहन करावा लागतो शेती बागायती मध्ये गव्याकडून तसेच अन्य वन्य प्राण्यांकडून मोठे नासधूस केली जाते. पावसाळ्यात गावातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात गव्हांकडून नुकसान करण्यात आले होते. दरवर्षी ही नुकसानी सुरूच असते शेतकऱ्यांची झालेले नुकसान भरपाई लक्षात घेता यावेळी उपसरपंच श्री पार्सेकर यांनी वनविभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करून आवश्यक ती पूर्तता वन विभागाच्या दप्तरी केली होती.

शेतकऱ्यांच्या सातबाराचा कागदपत्राची जुळवाजुळव करण्यापर्यंत श्री पार्सेकर यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आत्तापर्यंत त्याने 13 शेतकऱ्यांना तब्बल एक लाखाहून अधिक रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळवून दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली असून न्हावेलीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी श्री पार्सेकर यांचे आभार व्यक्त केले आहे.