
संगमेश्वर : रत्नागिरी जिल्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरजवळच्या असलेल्या आंगवली- मारळ येथील भगवा शंकराचे जागृत देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय( मठ )चा यात्रौत्सव आणि श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवी विवाह सोहळा असा कार्यक्रम १२, १३ जानेवारी २०२५ दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
या कार्यक्रममध्ये रविवार दि.१२ रोजी सकाळी १० वाजता वरद शंकराची पूजा, दुपारी ३.४५ वाजता ध्वजारोहण, सायंकाळी ४ ते ६ यावेळेत श्री मार्लेश्वर देव-देवतांना हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत खेळ पैठणीचा, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८ ते ९ महाप्रसाद, रात्री ९ वाजता 'गर्जा महाराष्ट्र माझा'हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दि. १३ दुपारी ३ वाजल्यापासून विविध मानांच्या पालख्या, दिंड्यांचे आंगवली येथील श्री मार्लेश्वर मंदिरात आगमन, सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत खेळ पैठणीचा भाग-२.
सायंकाळी ७.३० ते ९ या वेळेत श्री देव मार्लेश्वर विवाह सोहोळ्यात जाण्यापूर्वीचे सर्व विधी मंदिरात होतील. रात्री ११.३० वाजता श्री देव मार्लेश्वर, चि.सौ.कां.गिरिजादेवी यांच्या कल्याणविधी सोहोळ्याकरिता पालख्या,दिंड्यांचे शिखराकडे प्रयाण होणार आहेत.
दोन दिवस आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमात जास्तीत जास्त भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवली आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.