वेंगुर्ल्यातील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन स्कूलचं 11 जानेवारीला स्नेहसंमेलन

Edited by: दिपेश परब
Published on: January 09, 2025 12:08 PM
views 205  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 11 जानेवारी व रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी संध्याकाळी ०५.४५ पासून बक्षीस वितरण समारंभ तसेच करमणूकचे कार्यक्रम असणार आहेत. बक्षीस वितरण समारंभाला संत राऊळ महाराज काॅलेज कुडाळच्या प्राचार्या डाॅ. स्मिता सुरवसे,सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले  तसेच संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख व संचालक प्रशांत नेरूरकर उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ०६.०० वाजल्या पासून पूर्ण वेळ करमणूकीचे कार्यक्रम असणार आहेत. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचे दोन दिवस चालणारे कार्यक्रम म्हणजे वेंगुर्ल्याचा मिनी पर्यटन महोत्सव कम फुडफेस्टीवल असतो या ठिकाणी खवैय्या साठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टाॅल असतात. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या भव्यदिव्य कार्यक्रमाला मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांनी केले आहे.