तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवात पाडलोस आर्या गावडे प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: January 08, 2025 18:37 PM
views 205  views

सावंतवाडी : तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक पाडलोस शाळा नं. १ ची  विद्यार्थिनी आर्या सुनिल गावडे हि सावंतवाडी तालुक्यातील सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. तिने ५० मिटर धावण्याच्या क्रीडा प्रकारात सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. 

        

५० मिटर धावण्याच्या क्रीडा प्रकारात आर्या सुनिल गावडे हिने सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिचे सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, गट समन्वयक रघुनाथ पावसकर, केंद्रप्रमुख अनंत कदम, पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, उपाध्यक्ष सुधीर गावडे व पालकांनी अभिनंदन करून तिला जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आर्या गावडे हिला शाळेचे मुख्याध्यापक विजय गावडे व शिक्षक अनिल वरक यांचे मार्गदर्शन लाभले.