डॉ.होमी भाभा परीक्षेत चिदानंद रेडकर पात्र

Edited by: विनायक गांवस
Published on: January 08, 2025 16:36 PM
views 293  views

सावंतवाडी : डॉ.होमी भाभा यंग सायंटिस्ट परीक्षा आरपीडी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे घेण्यात आली. या परीक्षेला 11 विद्यार्थी सहभागी झाले होते. 

चिदानंद चंद्रशेखर रेडकर (इयत्ता 6वी) याला लेखी परीक्षेमध्ये 68 गुण मिळाले.  कोल्हापुरात घेण्यात आलेल्या द्वितीय स्तर- परीक्षेसाठी तो पात्र ठरला. प्राचार्य रेव्ह.फा.रिचर्ड सालदान्हा यांनी कु. चिदानंद यांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी पर्यवेक्षक टीचर.संध्या मुणगेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.