
देवगड : मस्त्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधिंनी सूचवलेली कामे कुवळे तर्फेवाडी येथील गणपती मंदिर सुशोभीकरण करणे (५ लक्ष) या कामाचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते पार पडले. या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
खासदार नारायण राणे आणि नामदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विकास निधी कमी पडू देणार नाही असे मत यावेळी साटम यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपा देवगड़ मंडल अध्यक्ष राजेंद्र शेटये, माजी जि. प.सदस्य सुभाष नार्वेकर बूथ अध्यक्ष सुनिल वलंजू , सरपंच सुभाष कदम, उपसरपंच प्रदोष देसाई, ग्रा.प.सदस्य सुहास राणे, सनिका म्हणायरे, रत्नदीप कुवळेकर, सुभाष थोरबोले, ग्रामस्थ अशोक तर्फे, सूर्यकांत कोकम, मधुकर म्हणायरे अन्य ग्रामस्थ आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते.