
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून नगरपालिकेचे सफाई कर्मचारी गेले दोन ते तीन दिवस कचरा उचलण्यासाठी आले नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे निदर्शनास येत आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे हे पालिकेतील केबिनमध्ये बसूनच प्रशासनाचा सर्व कारभार हाकत आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून स्वतः शहरात फिरून शहराची काय दुर्दशा झाली आहे ते बघावे. तसेच सामाजिक संस्था आणि नागरिकांची मदत घेऊन शहराची स्वच्छता करावी असे आवाहन भाजप प्रवक्ते अँड. संजू शिरोडकर यांनी केले आहे.
तसेच सावंतवाडी शहराच्या दुर्दशेला मुख्याधिकारीच जबाबदार आहेत असा आरोप करीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .