
दोडामार्ग : सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग च्या माध्यमातून कला- कौशल्य संगीत विद्यालय दोडामार्ग सुरु करत आहोत. या संगीत विद्यालयाचा उदघाट्न सोहळा रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी, सकाळी ठीक १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उदघाट्न सोहळ्यास संगीत कला प्रेमी, हितचिंतक तसेच सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंचाचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी केले आहे.
कला - कौशल्य संगीत विद्यालय दोडामार्ग या संगीत विद्यालयाचा उदघाट्न मा. गंगाराम जानू कोळेकर, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते होणार आहे.श्री. अनिल शेटकर, सरपंच - झरे-आंबेली ग्रुप ग्रामपंचायत झरेबांबर,श्री.आनंद महादेव ठाकूर, प्रो. प्रा. माऊली मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट रजनी क्लिनिक लॅब कॉम्पुटरराईज लॅब साटेली भेडशी वरचा बाजार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या संगीत विद्यालय झरेबांबर विमानतळ ( संजय तुकाराम सुतार यांच्या निवासस्थानी) याठीकाणी सुरु करत असून या संगीत विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपला नाव नोंदणी करावे नाव नोंदणी / अधिक माहितीसाठी 9763379306, 9423515011, 7517696374/ 8657691570, 9421265896, 8788399769 संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.