
सिंधुदुर्ग : कै. मनोरमा चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांच्याकडून वाढदिवसानिमित्त प.पु आप्पासाहेब पटवर्धन विद्यालय मांडकुलीस स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. याचे उद्घाटन मुंबईचे जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पेनसेट देण्यात आले. यावेळी न्यायाधीशांकडून विद्यार्थ्यांना भविष्यातील करियर बाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मनोरमा चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, पाट हायस्कूलचे कला शिक्षक व ट्रस्टचे सचिव संदिप साळसकर, मुख्याध्यापक श्री खोत, सहाय्यक शिक्षक राहुल कानडे, उपस्थित होते. सहाय्यक शिक्षिका सौ. रांगणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.