
सावर्डे : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान साने गुरुजींनी दिले. तुरुंगातच साने गुरुजींनी अनेक पुस्तकांचं लेखन केले. पुस्तक लेखनात साने गुरुजींच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव आढळतो.त्यांची अनेक पुस्तके ही लहान मुलांना प्रेरणादायी आहेत.त्यांच्या साहित्यामध्ये मानवतावाद, सामाजिक सुधारणा, देशभक्ती यासारखी मूल्ये ओतप्रोत भरलेली होती. ज्ञानी व सुसंस्कृत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून साने गुरुजींच्याकडे पाहिले जाते असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी या प्रसन्न केले.
मराठी साहित्यातील एक लेखक कवी समाजसेवक स्वातंत्र्य सैनिक आणि आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राचे गुरुजी बनलेल्या साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण,शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षक म्हणून केलेले कार्य, त्यांनी सुरू केलेलं विद्यार्थी नावाचे मासिक, लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा परिचय करून देताना मराठी साहित्याला मिळालेलं एक अक्षरधन म्हणजे श्यामची आई होय. चोरी करणं गुन्हा आहे, पोहायला जाण्यासाठी घाबरलेला श्याम,सुट्टीच्या दिवशी आईला घर कामांमध्ये मदत करणारा श्याम, यासारख्या अनेक उदाहरणांची माहिती विद्यार्थ्यांनी देऊन याचे अनुकरण करून प्रत्येक घरामध्ये सुसंस्कारित श्याम निर्माण होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा राजेंद्र वारे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमांमध्ये साने गुरुजी यांच्या बद्दल विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक शजयंत काकडे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाबद्दल सौ अपर्णा डिके यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमांचे नियोजन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक जयंत काकडे व साजिद चिकटे यांनी केले होते.
भित्तिपत्रकाचे अनावरण करताना सहाय्यक शिक्षक सुखदेव म्हस्के, प्राचार्य राजेंद्र वारे पर्यवेक्षक उद्धव तोडकर शिक्षक व विद्यार्थी