श्री देव लिंग क्षेत्रपाल देवाचा २७ डिसेंबरला जत्रोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: December 27, 2024 11:43 AM
views 110  views

सावंतवाडी : नवसाला पावणारा आणि हाकेला धावणार अशी ख्याती कीर्ती असलेल्या आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री देव लिंग क्षेत्रपाल देवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून ओटी भरणे, नवस फेडणे कार्यक्रम चालू होणार आहेत.

रात्री अकरा वाजता पालखी सोहळा व त्यानंतर खानोलकर दशावतार कंपनी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होईल.तरी सर्व भक्त आणि भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर परब यांनी केले आहे.