वैभववाडी : तालुक्यातील शिराळे येथे बीएसएनएलच्या मनो-याचे २६ डिसेंबरला भाजपाचे भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. गावातील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागला आहे.
शिराळे हे गाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात येते. या भागात गेल्या कित्येक वर्षांपासून कुठल्याही कंपनीची मोबाईल नेटवर्कची सुविधा नाही. या भागात मोबाईल मनोरा उभा राहावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. केंद्र शासनाच्या माध्यमातून बीएसएनएल कंपनीचा मनोरा मंजूर झाला. त्याच्या बांधकामाचं आज भूमिपूजन झाले. खा.नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हा मनोरा मंजूर झाला असल्याचे श्री.काळे यांनी सांगितले. गावक-यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच आभार मानले.
यावेळी माजी उपसरपंच सखाराम पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कोंडू शेळके, गंगुबाई शेळके, शिराळे भाजपा बूथ अध्यक्ष विजय पाटील, शिराळे भाजपा भटके विमुक्त आघाडी बूथ अध्यक्ष विठ्ठल उर्फ बाळा शेळके, रामचंद्र बोडेकर, अंबाजी बोडेकर, गंगाराम बोडेकर, घाटू कोकरे, संजय कोकरे आदी उपस्थित होते.