सावंतवाडी : युनिव्हरसिटीची डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन आर्किटेक्चर ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाल्याबद्दल आणि सावंतवाडी शिक्षक प्रसार व मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत भारत सरकारचे केंद्रिय राज्य ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ. दिनेश नागवेकर यांचा सत्कार करण्यात आला.
सावंतवाडी येथे भंडारी भवन येथील कै. सहदेव उर्फ काकासाहेब मांजरेकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावंतवाडी भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, उपाध्यक्ष देविदास आडारकर, सहसचिव नामदेव साटेलकर, खजिनदार चंद्रकांत वाडकर, सदस्य राजेंद्र बिर्जे, नंदकिशोर कोंडये, शंकर साळगांवकर, लवू कुडव, ज्ञानदीप राऊळ, सिद्धार्थ पराडकर, समता सुर्याजी, सुरेश राऊळ, पत्रकार प्रविण मांजरेकर, नारायण मसुरकर, कमलाकर मुंडये, किशोर चिटणीस हनुमंत पेडणेकर, निलेश कुडव, भंडारी समाज पतपेढीचे अध्यक्ष, गुरुदास पेडणेकर आणि भंडारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला मंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार डॉ. दिनेश नागवेकर आणि मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या हस्ते करण्यात आला. समाजातील सर्वोच्च व्यक्ती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार माझ्या हस्ते होत आहे. तसेच त्यांच्या हस्ते माझा सत्कार होत आहे. याबद्दल मला अभिमान व आनंद वाटत आहे असे प्रतिपादन डॉ. दिनेश नागवेकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
भंडारी मंडळाच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी श्रीपाद नाईक यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहसचिव नामदेव साटेलकर यांनी केले. उपाध्यक्ष देविदास आडारकर यांनी आभार मानले.