प्रसन्ना देसाई यांचे दिव्यांग बांधवांच्यावतीने अभिनंदन

बेस्ट सपोर्ट फाॅर व्हिसेबल पुरस्कार जाहीर
Edited by: दिपेश परब
Published on: December 21, 2024 17:09 PM
views 60  views

वेंगुर्ला : अपंगांनी अपंगांसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रीय अपंग महासंघ , महाराष्ट्र शाखा - जिल्हा सिंधुदुर्ग च्या सहकार्यातून  ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग फाऊंडेशन व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य सचिव बाळासाहेब पाटील यांनी  सन २०२४ - २५ चा राज्यस्तरीय " बेस्ट सपोर्ट फाॅर हिसेबल पुरस्कार " प्रसन्ना देसाई यांना जाहीर केला. 

विविध क्षेत्रात दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्तींनी दिव्यांगांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन , त्यांच्या गौरव म्हणून हा पुरस्कार ३ डिसेंबर ला जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून हा राज्यस्तरीय पुरस्कार कमिटीद्वारे बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केला .

भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा प्रभारी म्हणून संघटनात्मक जबाबदारी पार पाडत असताना दिव्यांगांसाठी विविध उपक्रम प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई घेत असतात , ह्याच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल वेंगुर्ले भाजपा कार्यालयात येऊन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे सहसंयोजक शामसुंदर लोट, दिव्यांग सेनेचे मनोज सातोसे व संजय देसाई, भाजपा  दिव्यांग आघाडीचे वेंगुर्ले संयोजक भरत परब यांनी प्रसंन्ना देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.