
सावंतवाडी : सावंतवाडी तळवणे गावचे सुपुत्र अजित अरुण पोळजी यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपली. पणदूर येथील संविता अनाथ आश्रमात धान्य वाटप करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. यासाठी त्यांना अनेकांचं सहकार्य लाभलं.
अजित पोळजी यांच्यासोबत भारती मठाचे मठाधिपती श्री. राजेंद्रस्वामी भारती महाराज (सावंतवाडी संस्थान राजगुरू) तळवणे आणि मळगावं गावचे सुधीर राऊळ आणि सीमा गिरी उपस्थित होते. या धान्य वाटप सहकार्यासाठी अजित पोळजी मित्रपरिवाराने एकत्रित मदत शिधा स्वरूपात तांदूळ, डाळ, तेल, पोहे, साखर, लोणचे, बिस्कीट अशा स्वरूपात संस्थेकडे अर्पण केला. यामध्ये स्वरगंधार प्रासादिक भजन मंडळ दांडेली यामधील बाबू गोडकर, सचिन उर्फ प्रसाद पांगम, ओंकार परब, ललित परब, ललित नाईक, कुलदीप नार्वेकर ,अमित परब, गौरेश पालयेकर, नारायण सावंत, सुरज वजरकर, दिनेश माणगांवकर, ओमप्रसाद आजगावकर यांनी सहकार्य केले.
तसेच आश्रमात परिस्थिती जाणून घेतली. तसेच येत्या 2 दिवसात अजित पोळजी हे मित्रपरिवारासोबत मुखबधिर शाळेलाही भेटणार असल्याचे सांगितले. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारे सेवा सुविधा सहकार्य करावे अशी विनंती यावेळी अजित पोळजी यांनी केली.