प्लास्टिक वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

18 हजार 200 चा दंड वसूल
Edited by:
Published on: December 21, 2024 12:54 PM
views 336  views

कणकवली : मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेते, फुल विक्रेते,स्थानिक बाजारपेठ, भाजीपाला विक्रेते आणि दुकाने यांच्यावर न.प.अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. या मोहिमेंतर्गत 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी, वस्तू वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात 18 किलो प्लास्टिक जप्त करून 18 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईमध्ये कणकवली नगरपंचायत पाणी पुरवठा व मलनिसारण अभियंता सोनाली खैरे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, ध्वजा उचले, आरोग्य लिपिक सतीश कांबळे, शहर समन्वयक वर्षा कांबळे, कणकवली नगरपंचायत कर्मचारी राजेश राणे, रवींद्र म्हाडेश्वर,सुजल मुणगेकर, संदेश तांबे व इतर नगरपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

     सर्व व्यापारी व नागरिकांनी 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळावा व कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.