परीट समाजाच्यावतीने संत गाडगेबाबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन

Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2024 12:49 PM
views 200  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरच्या हॉलमध्ये श्री संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. 

यावेळी सकाळी भाजी मंडईची साफसफाई करण्यात आली. तसेच आपापल्या भागातील परिसराची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. व सौ. सुरेश पन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुक्यातील परीट बांधवांची बैठक घेण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले की, यापुढे कोकण विभागाचा वधूवर मेळावा तसेच 23 फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्याचा मानस आहे. तसेच नवीन जिल्हा कार्यकारणी गठीत करायची आहे. व गाडगेबाबांचे विचार तळागळापर्यंत पोहोचविले पाहिजेत. परीट समाजातील सर्वांनी एक संघ राहिले पाहिजे. तसेच सर्वांनी आपापल्या तालुक्यात गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी केली त्याबद्दल जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकरांनी सर्वांचे अभिनंदन केले. जयंती ही  जिल्ह्याची एकत्र होते. ती यावेळी 23 फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत करण्याचे योजीले आहे असे यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले.

यावेळी तालुकाध्यक्ष राजू भालेकर, ज्येष्ठ सल्लागार मधुकर मोरजकर, जगन्नाथ वाडकर, मनोहर रेडकर, युनियनचे अध्यक्ष प्रदीप भालेकर, इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुका उपाध्यक्ष भगवान वाडकर, तालुका सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर, माजी. नगरसेविका दिपाली भालेकर, तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर, शहराध्यक्ष दयानंद रेडकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते विनायक आजगावकर व जगन्नाथ वाडकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. ह.भ.प. विनायक आजगावकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद व  राणी जानकीबाई सुतिकागृह व कुटीररुग्णालयात फळे व प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, भजन इत्यादी कार्यक्रम झाले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश तळवणेकर, दयानंद रेडकर, मनोहर रेडकर, प्रदिप भालेकर, संजय होडावडेकर, योगेश आरोलकर, किरण वाडकर, राजू भालेकर, सुरेंद्र कासकर, रितेश चव्हाण, दिनेश होडावडेकर, अनिल होडावडेकर, सुरेश पन्हाळकर, संतोष बांदेकर, संदीप कुपवडेकर, प्रवीण मोरजकर, ज्ञानेश्वर भालेकर, भगवान वाडकर, प्रकाश लोकळे,मारुती मोरजकर, लक्ष्मीदास आजगावकर इत्यादींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप भालेकर, स्वागत जितेंद्र मोरजकर व आभार संजय होडावडेकर यांनी मानले.