
सावंतवाडी : तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी तर्फे शनिवार १४ डिसेंबर रोजी दिवाणी न्यायालय सावंतवाडी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन लोकअदालतीच्या कामकाजाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जे. एम. मिस्त्री दिवाणी न्यायाधीश क. स्तर सावंतवाडी तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी, आर.जी. कुभांर, सहदिवाणी न्यायाधीश, क.स्तर सावंतवाडी वकील स्वप्नील कोलगांवकर, बँक अधिकारी, म.रा.वि.वि. कंपनी अधिकारी, ग्रामसेवक, बी.एस.एन.एल. अधिकारी, ओ.यु.शेख सहा. अधी. (प्रशा.) अडुळकर व. लिपीक, व्ही.ओ. देसाई, लघुलेखक, संतोष राऊळ, व. लिपीक, श्री. दिवाकर सावंत, क. लिपीक मराठे क. लिपीक, नाईक क. लिपीक, सौ. ओटवणेकर क. लिपिक सौ. डिसोजा क. लिपिक देसाई क. लिपिक, अभय चव्हाण, रश्मी शिरसाट न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी कडील २९ प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत,बी.एस.एन.एल. बँक, म.रा.वि.वि. कंपनी यांचे कडील एकूण प्रकरणे ३२० वादपुर्व प्रकरणे मिटविण्यात आली. निकाली प्रकरणांव्दारे सुमारे ११ लाख ४६ हजार एकशे त्रेचाळीस ऐवढी रक्कम सामोपचाराने भरणा करण्यात आली.