
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथका द्वारे दोडामार्ग शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते, फुलविक्रेते, मच्छीविक्रेते, किराणा दुकाने बेकारी पान स्टेल अशा दोडामार्ग बाजारपेठेतील प्लास्टिक जप्तीची कार्यवाही करण्यात आली.
यामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या अंदाजे १२ किलो एवढ्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून २००० रुपये एवढ्या रक्कमेची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक निवेद कांबळे, कर निरीक्षक लक्ष्मीकांत पिळणकर. संजय शिरोडकर, सिद्धेश शेगले, सुरेश गवस, स्वप्नील सावंत तसेच स्वच्छता दूत पथकाने हि कार्यवाही केली.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टिक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापराव बंदी केली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार दोषी आढळल्यास ५०० रु. जागेवर दंड व संस्थात्मक पातळीवर ५०००/- दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.