
सावंतवाडी : सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुलाबराव गावडे यांची चौकुळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी चौकुळ सरपंच सुरेश शेटवे, उपसरपंच लिना गावडे, चौकुळ सोसायटी चेअरमन पी डी गावडे, आंबोली सोसायटी चेअरमन शशी गावडे, संतोष पालेकर, अभिजित मेस्त्री, विजय गावडे, माजी सैनिक बापू गावडे, संजय गावडे, विनोद गावडे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.