
वैभववाडी : माध्यमिक विद्यालय उंबर्डे शाळेमध्ये सन २००२-२००३मधील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. या मेळाव्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेला वस्तू स्वरुपात भेट दिली.
शाळेतील जुने दिवस पुन्हा यावे याकरिता उंबर्डे येथील माजी विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा वर्ग भरला. येथील माध्यमिक विद्यालयात सन २००२-२००३या शैक्षणिक वर्षात दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांचा नुकताच स्नेहमेळावा विद्यालयात संपन्न झाला. यावेळी शाळेतील जुने दिवस आठवत या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. या मेळाव्याच्या सुरवातीला या वर्षात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या सर्वांना या माजी विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. प्रत्येकाने आपल्या आठवणी कथन केल्या. शाळा सोडून अनेक वर्षांनंतर मित्र मैत्रिणींच्या झालेल्या गाठीभेटींमुळे सारेच भारावून गेले. शाळेत केलेल्या खोड्या, शिक्षकांचा मिळेला ओरडा या आठवणींत विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला.
मेळाव्याच्या निमित्ताने या बॅचकडून शाळेला विज्ञान विभागासाठी कपाट भेटवस्तू म्हणून देण्यांत आली.या कार्यक्रमासाठी निवृत्त मुख्याध्यापक डी. एस. ढगे, एम. एन. पाटील, एस. एम. बोबडे , मुख्याध्यापक संजय राठोड, संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.