दुर्मीळ प्रजातींचे संरक्षण काळाची गरज : डॉ. मंगेश जांबळे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 12, 2024 15:03 PM
views 109  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेने नटलेला आहे. विविध प्रकारचे दुर्मीळ पक्षी, प्राणी, कीटक, बेडूक, कासव यांच्या प्रजाती येथे पाहायला मिळतात. यातील काही दुर्मीळ प्राण्यांचे पक्ष्यांचे जगाच्या नकाशावरील अस्तित्व धोक्यात आहे. लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. विदेशी पर्यटक आणि प्राणी-पक्षी अभ्यास का है. यांच्यासाठी जल्सुखद अनुभव आहे.जिल्ह्याला आवर्जून भेट देत असतात.अशा दुर्मीळ प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन होणे ही आता काळाची गरज आहे,असे मार्गदर्शन संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगेश जांबळे यांनी वरेरी येथे केले.

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर वरेरी गावठण येथे सुरू आहे.१० डिसेंबर रोजी 'प्राणी विश्वातील अद्भुत गोष्टी' या बौद्धिक चर्चासत्रात शिबिरार्थ्यांशी सुसंवाद साधताना डॉ. मंगेश जांबळे म्हणाले, देवगड तालुक्यात कासव संवर्धनासाठी स्थानिकांनी घेतलेला पुढाकार सुखावह आहे. पक्ष्यांमध्ये नर पक्षी हा मादीपेक्षा दिसायला रेखीव सुरेल आवाजात गाण्णारे असतात. सुगरण नर पक्षी आपले घरटे काटेरी झाडाच्या किंवा माडाच्या पानाच्या टोकावर झुलता घरटा बांधतो. घरटे बांधून झाल्यावर मादी पक्षाला विशिष्ट आवाज काढून घर पसंत करण्याचे जणू निमंत्रणच देतो. घरटे पसंत पडले तरच त्याची जोडीदार म्हणून निवड करते. बहिरी ससाणाा स्थलांतर करताना १३ दिवसांत ७३०० किलोमीटरचा प्रवास करत असल्याचे आता जिओ टॅगिंगच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. रंग बदलणारा शॅमेलिओन सरडा, दुर्मीळ बेडकांच्या प्रजाती, खवले मांजर, पावशा, सुगरण, पक्षी, कासव, घोरपड याशिवाय हरीयाल शेखरू यांची सविस्तर माहिती देऊन शिबीरार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी शिरगाव पंचक्रो शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष संभाजी साटम, शाळा समिर्त सदस्य दिनेश साटम, प्राचार्य सम् तारी, कार्यक्रम आधिकारी कोमल पाटील, सहायक कार्यक्र अधिकारी प्रा. आशय सावंत, मयुरी कुंभार, स्वयंसेवक प्रतिनिधी साक्षी शिद्वक, वैभव झाजम आदी उपस्थित होते.