कुडाळ न.पं.च्या बांधकाम - पर्यटन सभापतीपदी उदय मांजरेकर बिनविरोध

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 12, 2024 11:32 AM
views 235  views

कुडाळ :  कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी कार्यतत्पर नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष सौ खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सोबत उपनगराध्यक्ष किरण शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, ज्योती जळवी, सौ करोल, श्रृती वर्दम उपस्थित होते.