
सावंतवाडी : प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिरात अखंड गुरुचरित्र पारायण सप्ताहास विधिवत प्रारंभ झाला. याची सांगता १४ रोजी दत्त जयंतीला होणार आहे. यानिमित्त समाधी मंदिरात सकाळी प. पू कुडाळकर महाराज समाधी व उत्सव मूर्तीचे पूजन आणि दत्त मूर्ती आणि सर्व देवतांची व पूजा अभिषेक करण्यात आला.
गुरुचरित्र पोथ्यांचे पूजन रवींद्र कुडाळकर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन झाले. पुरोहित किरण मुंडले यांनी मंत्र उच्चारात पूजन केल्यानंतर महाभिषेक झाला. अॅड. सुरेंद्र मळगांवकर, महादेव रेडकर, अंकुश नाईक, प्रकाश केळुसकर, सुनील मेहत्री गजाननु रासम, सुरेश वरेकर,जया वरेकर, अनिकेत कुडाळकर, विनंती कुडाळकर आदी उपस्थित होते. कुडाळकर महाराजांच्या पुण्यातील मठातही अखंड गुरुचरित्र पारायण सप्ताहास प्रारंभ झाला. याचा लाभ घेण्याचे आवाहन समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिकेत कुडाळकर यांनी केले आहे.