जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'टीबी'मुक्त ग्रा.पं. पुरस्कार वितरण

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 10, 2024 19:26 PM
views 141  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे. या ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.