
कुडाळ : कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे 07 डिसेंबर रोजी इंग्रजी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून डॉ. सई राणे उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र गवस (सहसचिव, क. म . शि. प्र. मंडळ) होते. प्रमुख पाहुण्यांच्या सोबतीने प्राचार्य श्री. ठाकूर, पर्यवेक्षक भोगटे सर, श्री तेली आणि ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य साळवी यांचीही उपस्थिती होती.
यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध इंग्रजी कार्यक्रम सादर करून आपले भाषिक कौशल्य दाखवले. यामध्ये भाषण, नाटिका, नृत्य आणि संगीताचे सादरीकरण यांचा समावेश होता. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा विषयक उत्कृष्ट मॉडेल्स सादर केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समिक्षा फडके, तनिष्का शेलटे आणि गौतमी कोचरेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी किमया सडवेलकरने आभारप्रदर्शन केले. संस्था सदस्य मुख्याध्यापक श्री. ठाकूर यांनी श्री तेली आणि इंग्रजी विभाग प्रमुख सौ. नाखरे आणि इंग्रजी विभागातील मोहिते मॅडम, नाईक मॅडम, पवार सर, पोटे सर, दरवडा सर, शिरसाट सर आणि सावंत सर यांचे मोलाचे योगदान असल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
कार्यक्रमातील एक खास आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुण्यांनी शाळेला शुभेच्छा म्हणून दोन पुस्तके भेट दिली. प्राचार्य एम. बी. ठाकूर आणि इतर मान्यवरांनी विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान केला व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वृद्धिंगत करणारा ठरला.