कनेडीत 'दप्तरविना शाळा'

Edited by:
Published on: December 07, 2024 19:53 PM
views 155  views

कणकवली : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.  कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे  वार- गुरुवार, दिनांक- ०७ डिसेंबर २०२४ रोजी, डिव्हग्लोबल एज्युकेअर फाउंडेशन,दापोली यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना लाठी- काठी प्रशिक्षण व करिअर  मार्गदर्शन करण्यात आले.

लाठी- काठी हा एक प्राचीन मर्दानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा एक मोहक खेळ, एक व्यायाम साधना, स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे या मूलभूत गरजातून  लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम कनेडी प्रशालेत  स्वसंरक्षणासाठी लाठी- काठी प्रशिक्षण व जीवन कौशल्य आधारित मार्गदर्शन वर्गाचे आयोजित करण्यात आले. हे प्रशिक्षण वर्ग दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आले. पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना लाठी- काठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिकासह ट्रेनिंग देण्यात आले. तर दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आधारित मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी  कार्यक्रमाध्यक्ष सतीश सावंत, अध्यक्ष क.शि.प्र.मंडळ मुंबई, शालेय समिती चेअरमन  आर.एच.सावंत, सर्वे संस्था पदाधिकारी, लाठी- काठी प्रमुख प्रशिक्षक व मार्गदर्शकसुरेंद्र शिंदे, दापोली, वैष्णवी मिसाळ,सिद्धी चव्हाण,आंतरराष्ट्रीय लाठी- काठी सुवर्ण पदक विजेते खेळाडू, जीवन कौशल्य मार्गदशिका सानिका बांद्रे, डायरेक्टर, डिव्हग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन, या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य हरिश सावंत, परतकामवाडी, भिरवंडे, सल्लागार, डिव्हग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक व प्राचार्य सुमंत दळवी, प्रशालेचे पर्यवेक्षक सन्मा. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री.प्रसाद मसुरकर सर तर कार्यक्रमाचे आभार एस.आर.तांबे यांनी मानले.