
सावंतवाडी : बसस्थानकावर प्रवाशांसाठी सुविधा नसल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास करून येतात. तर अन्य प्रवासी गावी जाण्यासाठी बसस्थानकात थांबतात. तहानलेल्या प्रवाशांना पिण्यासाठी अथवा फ्रेश होण्यासाठी बसस्थानकात पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. एसटी आगार प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोईबाबत गांभीर्याने घेतलेले नाही. बसस्थानकात कित्येक वर्षांपासून बांधलेली पाण्याची टाकी बंदावस्थेत आहे. पाण्याच्या टाकीलाही गळती लागली आहे ती दुरुस्ती करण्याबबत आगाराकडून कोणतीही सोय केलेली दिसत नाही. पाण्याबाबत अनेक प्रवासी विचारणा करतात. परंतु पाण्याची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे प्रवासी संतप्त आहेत. जुनी पाण्याची टाकी मोडकळीस आल्यास महामंडळाने पर्यायी प्लास्टिक टाकी ठेवून त्याद्वारे प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे