
देवगड : देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव- राकसघाटी येथे देवगडवरुन नांदगावकडे जाणा-या कारला गवारेड्याची जोरदार धडक बसून देवगड तालुक्यातील इळये येथील अभिषेक मिराशी बालबाल बचावले या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
देवगड तालुक्यातील इळये येथील अभिषेक मिराशी हे ईन्व्हा कारने इळये येथून नांदगावकडे जात असताना शिरगाव राकसघाटी ( कापीचा चाळा) येथे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या गवारेड्याने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने गाडीमधील कोणासही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट व ठाकूरवाडी वनरक्षक रामदास घुगे यांनी पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले उपस्थित होते. शिरगाव परिसरातील गवारेड्याच्या हल्ल्यातील ९ महिन्यातील हि पाचवी घटना आहे. फेब्रुवारी महिन्यात राकसघाटी येथे चारचाकी गाडीवर गवारेड्याने हल्ला केल्याने अपघात झाला होता. मार्च महिन्यात शिरगांव कुवळे मार्गावर चौकेवाडी फाट्यानजीक बाबल्या पवार यांच्या दुचाकीवर गवारेड्याने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले होते. तसेच एप्रिल महिन्यात गवारेड्याच्या हल्ल्यात प्रकाश गोगटे यां चारचाकीचे मोठे नुकसान झाले होते.तसेच गेल्या महिन्यात शिरगांव- राकसघाटी येथे गव्यारेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. चारचाकीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच गेल्या महिन्यात शिरगांव- राकसघाटी येथे गव्यारेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता.