जि. प. कृषि विभागामार्फत भाजीपाला मिनीकिट उपलब्ध

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 06, 2024 21:34 PM
views 102  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या रोजच्या आहारात ताजा भाजीपाला मिळावा. यासाठी जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर भाजीपाला  बियाणी किट पुरविण्याची योजना राबविण्यात आली आहे . या योजनेअन्तर्गत २६६६ भाजिपाला बियाणी किट उपलब्ध झाली आहेत.

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कृषिक्षेत्र  लागवडीखाली यावे. कृषी उत्पन्नात भर पडावी आणि कृषी क्षेत्राची प्रगती व्हावी. यासाठी प्रशासनाचे  प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप हंगामात सुधारित व संकरित भात बियाण्यांचा पुरवठा केला जातो. खतांचाही मुबलक पुरवठा केला जातो. तसेच आता सुरू होणाऱ्या  रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी आपल्या परसबागेत भाजीपाल्याचे उत्पादन घ्यावे, रोजच्या आहारात ताज्या भाजीपाल्याचा वापर करावा. यासाठी विविध प्रकारच्या भाजीपाला बियाण्यांचा पुरवठा करण्याची योजना राबवली जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने एकूण २६६६ भाजीपाला मिनी किट उपलब्ध केले असून पंचायत समिती स्तरावर त्याचे वितरण केले जात आहे.  शेतकरी नवनवीन सुधारित बियाण्यांचा वापर करून कृषी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहे.प्रतेक कुटुंब रोजच्या आहारात भाजिपल्याचा वापर करीत आहे. आपल्या कुटुंबासाठी आवश्यक असलेला भाजीपाला आपल्याच परसबागेत उत्पादित करावा.हा उद्देश् ठेऊन  जिल्हा परिषद कृषी विभागाने मिनी भाजीपाला बियाणी कीट ७५ टक्के अनुदानावर देण्याची योजना राबविली आहे. त्यासाठी २६६६ एवढे भाजीपाला बियाणी किट उपलब्ध केली असून तालुका स्तरावर वितरित करण्यात आली आहेत.त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. 

आता रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत सुरू केली आहे. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत भाजीपाला सुधारित बियाण्यांचे किट उपलब्ध करून दिले आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी भुईमूग, कुळीत, चवळी, नाचणी,वरी, यासारखे उन्हाळी पीक घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी विभागामार्फत रब्बी हंगामा साठी भेंडी (तनवी),वाल (कोकण भूषण), मुळा (पुसाचेतकी), पालक (ऑल ग्रीन), मिरची (पुसा ज्वाला) ,चवळी (पार्वती),अश्या सुधारित जातीच्या बियाण्यांचा समावेश आहे. प्रत्तेक किट मध्ये ४३० ग्रॅम बियाणे असून याची किम्मत २०० रूपये असून  शेतकऱ्यांना ५० रूपये  सवलतीच्या दरात दिले जाणार आहे.


पंचायत समिती स्तरावर वितरण


रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत भाजीपाला बियाणे उपलब्ध व्हावे. यासाठी पंचायत समिती स्तरावर भाजीपाला मिनी किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार देवगड ४००, वैभववाडी १५०, कणकवली ४१५, मालवण ३५०, वेंगुर्ला २०१, कुडाळ ५००, सावंतवाडी ४५०, दोडा मार्ग २०० किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी जानबा झगडे यांनी दिली.