
मालवण : जिल्हा बांधकाम अधिकारी यांच्यावतीने वायरी गावातील बांधकाम कामगारांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व बांधकाम कामगारांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली.
वायरी येथील माणगावकर काजू फॅक्टरी येथे आयोजित केलेल्या या शिबिरास वायरी भुथनाथ ग्रामपंचायत उपसरपंच प्राची माणगावकर, देवानंद लुडबे, पराग माणगावकर, दीपक गरुड, ममता तळगावकर आदी उपस्थित होते. या शिबिरास मालवण ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी पूजा चव्हाण, तन्वी बिरमोळे, चैताली चव्हाण, रंजना फाटक, यांचे सहकार्य मिळाले.
यावेळी यावेळी हनुमंत गावकर, अर्पिता गावकर, विनोद गोसावी, विशाखा गोसावी, भालचंद्र गावकर, गणेश गोसावी, आनंद मिठबावकर, मानसी गावकर, आदित्य मिठबावकर, रिया गावकर, भगवान गरुड, दत्तात्रय साळगावकर, अभिमन्यू गावकर, वैदेही गावकर, लावण्या गावकर, शोभा मिठबावकर, संजना मिठबावकर, आदींची आरोग्य तपासणी करण्यात आली.