
दोडामार्ग : माणुसकीचे नाते जपणारी आणि जात, पात, पंत, पक्ष यापलीकडे काम करणारी माऊली राजमाता उपमा गावडे यांचे रुग्ण सेवा कार्य निरंतर ठेवणारा उपक्रम म्हणजे दोडामार्गातील अनेकांची मने जिंकणारा उपक्रम होय असे प्रतिपादन डॉ सुभाश वेलिंगकर यांनी केले.
भारतमाता की जय संचलित राजमाता कै. उपमा गोपाळ गावडे रुग्णसेवा केंद्र उद्घाटन सोहळा व स्मरणीका पुस्तकाचे प्रकाश सोहळा येथील महाराजा हॉल येथे पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत भारतमाता कि जय संघाचे अध्यक्ष श्रीनिवास गावडे, रामदास मणेरीकर, संघचालक प्रवीण, आत्माराम गावकर, गोवा येथील भारत माता की जय संघाचे सदस्य विनिता देसाई, कार्यवाहक वैभव रेडकर, रुग्णसेवा संघांचे सल्लागार डॉ. नंदकिशोर दळवी, मयूर दळवी, महिला भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष दिक्षा महालकर, शिवसेना महिला चेतना गडेकर, भारत माता की जय सांगाचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संखेने उपस्तित होते.
राजमाता उपमा गावडे यांच्या प्रथम स्मुर्ती दिनाचे औचित्त साधून भारतमाता की जय संघ संचलित रुग्णसेवा केंद्राचे उद्घाटन डॉ सुभाश वेलिंगकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेकांनी उपमा गावडे यांच्या जीवन चरित्रावर भाषण केले. जिने आपल्या घरात शिजलेले अन्न शेजाऱ्याला द्यायच आणि मग आपण ग्रहण करावे असा अभ्यासाच धडा शीकविणाऱ्या उपमा गावडे ( आई ) यांनी आपल्या जीवनाता प्रत्येकाच्या मनात घर निर्माण करून आज ती समाजमाता बनली आहे असे आत्माराम गावकर म्हणाले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली रेडकर तर प्रास्तविक आत्माराम गावकर यांनी तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारतमाता की जय संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.